पारोळा/जळगांव - मंगळा गौर कार्यक्रम - प्रबोधन संस्था
पारोळा वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने मंगळा गौर कार्यक्रम सपन्न..
पारोळा (प्रतिनिधी) श्रावण मानसी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही कडे श्रावण महिना लागला कि सणांची सुरुवात होत असते अशा श्रावण महीण्यात अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन महीला मंडळ च्या वतीने आयोजीत वाणी समाज मंगल कार्यालय येथे मातृशक्ती महीला मंचच्या महीलांनी सादर केलेल्या मंगळगौर या कार्यक्रमाच्या माध्यमातुन उत्कृष्ट पणे आपल्या सणांची माहीती तसेच पथनाट्यच्या माध्यमातुन पाणी वाचवा हा संदेश दिला तसेच फुगडी,गरबा,अश्या विविध गाण्यांवर नाच गाणी सादर करीत कार्यक्रम मनोरंजक व रंगतदार पणे सादर केला.
तसेच प्रबोधन महिला मंडळ हे आज काल समाजात घडत असलेल्या परिस्थिती बद्दल जनजागृती करण्याचे काम करीत आहे, यात कुठलाही कार्यक्रम हा ठरलेल्या वेळेवर सुरू करणे, जेवतांना कोणीही पंगतीत बसलेल्या व्यक्तीच्या मागे उभे राहु नये तसेच कुठलाही कार्यक्रम म्हटला कि पत्रिका छापल्या जात असतात व कार्यक्रमांचे अध्यक्ष,प्रमुख पाहुणे यांची नावे त्या पत्रिकेत टाकली जात असतात परंतु या पारोळा प्रबोधन मंडळाने नवा पायंडा पाडीत उपस्थित महिलांची क्रमाने नावे लिहुन त्याचा लकी नंबर काढुन त्यातुन कार्यक्रमांचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांची सर्व सामान्य महिलांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला यात शुभांगी मनोहर मुसळे, मोहिनी देविदास शेंडे, वरलक्ष्मी सतिष अमृतकर तामसवाडी यांना लकी प्रमुख म्हणून यांची नावे निघालीत त्याच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. तर यावेळी ज्येष्ठ महिला पुष्पलता देविदास शेंडे जळगांव, ताराबाई प्रभाकर अमृतकर तामसवाडी या महिलांचा सत्कार करण्यात आला हा उपक्रम उपस्थित सर्व महिलांना आवडला याबद्दल प्रबोधन महिला मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी असंख्य महिलांची उपस्थिती होती
कार्यक्रम यशस्वीते साठी अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन मंडळ पारोळा च्या सर्व मान्यवर सदस्यांनी परिश्रम घेतले.