भाषा:

समाज क्रांती दिन

25-06-2026 24 दृश्ये
समाज क्रांती दिन
▪️ १८ वा समाज क्रांती दिन ▪️
सन २००८ मध्ये आजच्याच दिवशी समाजाच्या विकासाचा अश्व सर्वदूर उधळण्यासाठी झालेला आपल्या लाडशाखीय वाणी समाजाला ओ.बी.सी.प्रवर्गात समाविष्ट करण्याचा क्रांतिकारी निर्णय.....
👉🏻 काय झाले या क्रांतिकारी निर्णयामुळे तर बसता समाज...उठता झाला.... उठता समाज चालता झाला.... आणि चालता समाज चक्क धावायला लागला.....
👉🏻 कसा झाला हा चमत्कार....
👉🏻 कुणाही समाज बांधवाला कुठल्याही प्रकारची तोशिस लागू न देता....
👉🏻 कोण आहे या यशाचा खरा शिल्पकार....
👉🏻 ज्याचे हात आभाळाला लागले आहेत... पण आजही ज्याचे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले आहेत... असे समाज मनाच्या गळ्यातला ताईत असलेले... निगर्वी तरुण नेतृत्व ....सुनिल नेरकर....
समाजबांधवांच्या ह्रदयस्थानी स्थान असलेले तात्या आणि सोबत समाज परिवर्तनाची उमेद बाळगुन सर्वोतोपरी साथ-संगत करणारे जीवाभावाचे सहकारी....

आज २५ जून २०२६
या २००८ ते २०२६ या कालखंडातील समाजाची सर्वसाक्षी आहे. समाजाने कात टाकली... समाजाच्या हुशारीचे आणि हुशारांचे सर्वच क्षेत्रांमध्ये धडाकेबाज प्रवेश सुरु झाले... दखल घेतली जावु लागली, कौतुक होऊ लागले. गुणीजनांवर अधिकारदाच्या झुली चढू लागल्या... आम्ही सर्वच क्षेत्रांमध्ये नक्कीच हा यश मिळवू शकतो हा आत्मविश्वास समाज मनात जागा झाला.
आजचा दिवस समाजक्रांती दिवस म्हणून साजरा करण्याची संकल्पना प्रबोधन संस्थेतर्फे मांडली गेली.
प्रत्येक समाज बांधवाने अभिमानाने आजचा दिवस साजरा करायला हवा आणि ज्यांनी हा दिवस समाजजीवनात उगवण्यासाठी अपार मेहनत घेतली त्यांना धन्यवाद द्यायला हवेत....!!
आज समाजक्रांती दिनाच्या सर्व समाजबांधवांना लक्ष लक्ष शुभेच्छा..!!
प्रबोधन पर्व.. आपण सर्व..!!
💐💐💐💐💐💐💐💐💐