भाषा:
प्रबोधन संस्था

अखिल भारतीय वाणी समाज

प्रबोधन संस्था

प्रबोधन पर्व.. आपण सर्व..!!

समाज कल्याणासाठी समर्पित

Dedicated to the Welfare of Society

समाज संघटन

समाज संघटन

संस्था समाजातील विविध घटकांना एकत्र आणून संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. समाजातील य...

अधिक वाचा
सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम

सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम

संस्था विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहमेळावे, समाज प्रबोधन परिषद, युवक मेळावे आणि सामाजिक उपक्रमां...

अधिक वाचा
महिला सक्षमीकरण व विकास

महिला सक्षमीकरण व विकास

महिला सक्षमीकरण व विकास संस्था महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रशिक्षण शिबिरे, कौशल्य विकास...

अधिक वाचा
शिक्षण व विद्यार्थी विकास

शिक्षण व विद्यार्थी विकास

शिक्षण व विद्यार्थी विकास संस्था विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविते. गुणवंत...

अधिक वाचा
प्रबोधन प्रिमियर लीग, पिंपरी चिंचवड

प्रबोधन प्रिमियर लीग, पिंपरी चिंचवड

खेळातून समाज संघटन या भावनेतून शहरातील युवकांचे संघटन होण्यासाठी पिंपरी चिंचवड युवा अध्यक्ष चि. सौरभ...

अधिक वाचा
समाज क्रांती दिन

समाज क्रांती दिन

▪️समाज क्रांती दिन ▪️ सन २००८ मध्ये २५ जून या दिवशी समाजाच्या विकासाचा अश्व सर्वदूर उधळण्यासाठी झाल...

अधिक वाचा
समाजासाठी ऐतिहासिक योगदान

समाजासाठी ऐतिहासिक योगदान

अखिल भारतीय वाणी समाज ‘प्रबोधन संस्था’ सामाजिक कार्यात अग्रेसर असून संस्थेच्या माध्यमातून वाणी समाजा...

अधिक वाचा

प्रबोधन संस्थेत आपले स्‍वागत आहे !

’अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था’, ही संस्था २००५ पासुन ज्ञान, कला, सांस्कृतिक आणि सामजिक सेवेत भारतात अग्रेसर आहे. समाज संघटनेतून.. समाज प्रबोधनाकडे..!! आज संस्थेतर्फ़े संपूर्ण महाराष्ट्रात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला आहे, संस्थेच्या व्यास पिठावर आज तागायत अनेक दिग्गज्जांनी उपस्थिती नोंदवली आहे. सामाजिक क्षेत्रातील प्रबोधनची घोडदौड सर्वश्रुत आहे. भव्य-दिव्य समाजिक- सांस्कॄतिक अनेकाविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करुन प्रबोधनने समाज बांधवांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटविला आहे.

OBC चा प्रवास

प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून वाणी समाजाला OBC प्रवर्गात सामील करण्यात आले.

Read More

प्रबोधनचे शैक्षणिक कार्य

OBC प्रवर्ग मिळाल्या नंतर, समाजातील अनेक मुला-मुलींचा OBC च्या माध्यमातून शाळा कॉलेज मध्ये प्रवेश निश्चित झाला.

Coming Soon

प्रबोधन वैद्यकीय आघाडी

वैद्यकीय उत्पादन करणारी स्वतःची संस्था स्थापन करून समाजातील युवकांना रोजगार मिळवून देणे

Coming Soon

प्रबोधन कलाकार

वाणी समाजातील कलाकारांना प्लॅटफॉर्म मिळवून देणे, सर्व कलाकारांना सामावून घेत चित्रपट तयार करणे.

Coming Soon

युवा

युवा

Coming Soon

महिला आघाडी

महिला आघाडी

Coming Soon
उपक्रम / घडामोडी

ज्ञान, कला आणि समाज सेवा

'ज्ञान, कला आणि समाज सेवा' या मुळ तत्वाशी 'प्रबोधन' संस्था कायम बांधील आहे.

ताज्या बातम्या
समाज क्रांती दिन
समाज क्रांती दिन

▪️ १८ वा समाज क्रांती दिन ▪️ सन २००८ मध्ये आजच्याच दिवशी समाजाच्या विकासाचा...

वाचा
प्रबोधन प्रिमियर लीग
प्रबोधन प्रिमियर लीग

खेळातून समाज संघटन या भावनेतून शहरातील युवकांचे संघटन होण्यासाठी पिंपरी चिंचवड य...

वाचा
राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक - पत्रकार परिषद,धुळे
राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक - पत्रकार परिषद,धुळे

धुळे येथे २० जुलै २०२५ रोजी होणाऱ्या वाणी समाजाच्या प्रबोधन संस्थेचा राष्ट्रीय क...

वाचा
राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक - सभा मंडप पूजन,धुळे
राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक - सभा मंडप पूजन,धुळे

अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक निर्विघ्न पार पा...

वाचा
समाजाची पहिली घटना
समाजाची पहिली घटना

लाडशाखीय वाणी समाजाच्या संघटनात्मक आणि वैचारिक जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या धु...

वाचा
प्रबोधन प्रचारक
प्रबोधन प्रचारक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात "प्रचारक" या संज्ञेला अनन्यसाधारण महत्व आहे, प्रचारक य...

वाचा
Leadership

प्रमुख पदाधिकारी परिचय

आपल्या संस्थेचे प्रमुख पदाधिकारी यांची माहिती

तात्याश्री. सुनिल तुकाराम नेरकर
राष्ट्रीय अध्यक्ष - अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था

तात्याश्री. सुनिल तुकाराम नेरकर

01
तात्याश्री. सुनिल तुकाराम नेरकर
राष्ट्रीय अध्यक्ष - अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था
धुळे येथील अत्यंत सामान्य व आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःच्या जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या बळावर उभे राहिलेले तात्याश्री सुनिल तुकाराम नेरकर यांनी पीठ गिरणी, रॉकेल व्यवसाय आदी विविध व्यवसाय सांभाळत शिक्षण पूर्ण केले. समाजातील प्रश्नांची जवळून जाणीव झाल्याने त्यांनी समाजसेवेचा वसा स्वीकारला आणि अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून समाज संघटन, शैक्षणिक प्रगती व सामाजिक जागृतीसाठी उल्लेखनीय कार्य केले. राजकीय क्षेत्रातही त्यांनी सक्रिय योगदान देत विशाल खान्देशचे नेते - माजी विरोधी पक्षनेते मा. आमदार एकनाथराव खडसे. (नाथाभाऊ) यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष, धुळे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.
लाडशाखीय वाणी समाजाला ओबीसी प्रवर्गाचा लाभ मिळवून देणे आणि समाजातील विवाह समस्येवर उपाय म्हणून लाड व लिंगायत वाणी पोटजातींमधील विवाहांना सामाजिक मान्यता मिळवून देणे, ही त्यांच्या कार्यातील दोन ऐतिहासिक यशे मानली जातात. समाजाला ओबीसी प्रवर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आणि या कार्यात आदरणीय नाथाभाऊ यांचे मार्गदर्शन व कृपाशीर्वाद लाभला. या निर्णयामुळे समाजातील हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक व शासकीय सवलतींचा लाभ मिळण्याचा मार्ग खुला झाला. समाजहितासाठी झटणारे नेतृत्व, संघटन कौशल्य आणि दूरदृष्टीपूर्ण विचार यांमुळे तात्याश्री सुनिल तुकाराम नेरकर यांचे नाव समाजाच्या इतिहासात विशेष आदराने घेतले जाते.
बापूश्री. सुरेश पुंडलिक शिरुडे
राष्ट्रीय उपाध्यक्ष - अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था

बापूश्री. सुरेश पुंडलिक शिरुडे

02
श्री. सुरेश बापू शिरुडे यांचा जीवनप्रवास हा संघर्ष, कष्ट, समाजसेवा आणि यश यांचा प्रेरणादायी संगम आहे. नाशिक जिल्ह्यातील एका साध्या कुटुंबात जन्मलेल्या सुरेशजींनी गरीबी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वयाच्या सोळाव्या वर्षी पुण्यात येत स्वतःचे भविष्य घडवले. बजाज ऑटोमध्ये १८ वर्षे नोकरी करताना त्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि कार्यनिष्ठा आत्मसात केली. त्यानंतर जमीन व्यवहार आणि बांधकाम क्षेत्रात प्रवेश करून ‘भूमी इन्फ्राकॉन’च्या माध्यमातून यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण केली. समाजाचे देणे फेडण्याच्या भावनेतून त्यांनी प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, संस्कार, समाजसंघटन आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले. रक्तदान शिबिरे, गुणवंत विद्यार्थी सत्कार, आदर्श माता पुरस्कार आणि गरजू विद्यार्थ्यांचे पालकत्व यांसारख्या उपक्रमांतून त्यांनी समाजहिताचे कार्य केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यातून त्यांनी राष्ट्रसेवेची भूमिका निभावली. अध्यात्माला जीवनाचा आधार मानून त्यांनी अनेक आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले. माणसे जोडणे, त्यांना प्रेरणा देणे आणि समाजाला सकारात्मक दिशा देणे हेच त्यांच्या जीवनकार्याचे वैशिष्ट्य राहिले आहे. संघर्षातून उभे राहून समाजासाठी समर्पित जीवन जगणारे सुरेशजी हे अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत.

Biography
प्रा. डॉ. दीपक राजाराम येवले
राष्ट्रीय कार्यवाह - अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था

प्रा. डॉ. दीपक राजाराम येवले

03
प्रा. डॉ. दीपक राजाराम येवले यांचा अल्पपरिचय - प्रा. डॉ. दीपक राजाराम येवले हे एक प्रथितयश प्राध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते सध्या आकुर्डी (पुणे) येथील प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सांख्यिकी (Statistics) विभागाचे प्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक पात्रता: * त्यांनी पुणे विद्यापीठातून सांख्यिकी विषयात बी.एस्सी. आणि एम.एस्सी. पदवी प्राप्त केली आहे.  * तसेच ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये त्यांनी पदव्युत्तर पदविका पूर्ण केली आहे.  * २०२३ मध्ये त्यांनी 'विवाह जुळवणीतील सांख्यिकीय विश्लेषण' या विषयावर पीएच.डी. संपादन केली आहे. *व्यावसायिक अनुभव आणि शैक्षणिक पदे:* * १९९२ पासून ते विविध महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करत असून, त्यांना या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे.  * ते रामकृष्ण मोरे महाविद्यालयात सांख्यिकी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष (२०२३-२०२८) आणि विद्या परिषदेचे सदस्य आहेत.  * त्यांनी २००५ ते २०१० या काळात पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे.  * तसेच, ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समतुल्यता समितीसह इतर विविध समित्यांवर आणि 'Academia Association' चे कोअर समिती सदस्य म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक कार्य आणि योगदान: * ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP), आकुर्डी नगराचे अध्यक्ष आहेत.  * महाविद्यालयाचे नियतकालिक 'होरायझन' (Horizon) आणि 'चैतन्यदीप' मासिकाचे संपादक म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत.  * रूबी पार्क सोसायटी व पार्क स्ट्रीट फेडरल सोसायटीचे ते कार्यकारी सदस्य (Executive Member) आहेत.  * समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या डॉ. येवले यांनी १६,००० पेक्षा जास्त विवाह जुळवण्यात यशस्वी मध्यस्थी केली आहे.  * ते अखिल भारतीय वाणी समाजाचे राष्ट्रीय संघटक आणि कार्यवाह आहेत.  * डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या 'स्थूलता आणि मधुमेह मुक्त विश्व' मोहिमेचे ते समन्वयक आहेत. *पुरस्कार आणि सन्मान:*  * त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना 'उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार' (२००१, २०१५), 'समाज सेवा पुरस्कार' (२००६), 'उद्योजश्री पुरस्कार' (२०१५), 'खानदेश भूषण पुरस्कार' (२०१६) आणि 'कोरोना योद्धा पुरस्कार' (२०२१) यांसह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

500+

प्रबोधन केंद्र

1.2L+

सेवार्थी

50+

सामाजिक उपक्रम

25+

वर्षांचा अनुभव

1000+

स्वयंसेवक

500+

प्रबोधन केंद्र

1.2L+

सेवार्थी

50+

सामाजिक उपक्रम

25+

वर्षांचा अनुभव

1000+

स्वयंसेवक

Gallery Image
1 / 1
समाजसेवा • शिक्षण • प्रबोधन

आमच्याबद्दल

सर्व सामान्यांच्या हितासाठी समाजाने समाजासाठी चालवलेली आणि शासन दरबारी नोंद असलेली एक अग्रगण्य सामाजिक संस्था.

आमचे उद्दिष्ट समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षित, सक्षम आणि संघटित करणे आहे. आम्ही विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रम राबवून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहोत.

शैक्षणिक मार्गदर्शन
समाज संघटन
महिला सक्षमीकरण
सामाजिक उपक्रम

500+

प्रबोधन केंद्र

1.2L+

सेवार्थी

50+

उपक्रम

आमचे Social Media अपडेट्स

आमच्या सोशल मीडिया पेजवर नवीनतम पोस्ट पहा आणि आमच्याशी जोडले राहा

संपर्क करा

अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क करा

कार्यालयाचा पत्ता

प्रबोधन संस्था, राष्ट्रीय कार्यालय, कानुश्री टॉवर्स, बडगुजर प्लॉट, धुळे जिल्हा धुळे , महाराष्ट्र - 424001

02562-283999

ईमेल पत्ता

prabodhansanstha1@gmail.com

सहाय्य:
prabodhansanstha1@gmail.com

कार्यालय वेळ

सोम-शुक्र: सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00

शनिवार: सकाळी 10:00 ते दुपारी 2:00

सोशल मीडिया वर आम्हाला फॉलो करा