भाषा:

प्रबोधन प्रचारक

21-06-2025 36 दृश्ये
प्रबोधन प्रचारक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात "प्रचारक" या संज्ञेला अनन्यसाधारण महत्व आहे, प्रचारक यांच्या समर्पित कार्यामुळेच संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी १९२५ साली मांडलेले विचार, समर्पित भावना, राष्ट्रप्रेम आणि त्याला अनुसरुन आचरण या पिढीकडून त्या पिढीकडे विनासायास परावर्तीत होत आहेत, याच धर्तीवर प्रबोधन संस्थेत देखील ज्येष्ठ आणि अनुभवी सामाजिक कार्यकर्त्यांना "प्रबोधन प्रचारक" हि जबाबदारी दिली जाते. आपल्या वस्ती / कार्यक्षेत्रातील समाज बंधू भगिनींच्या घरी भेटी देणे, अनौपचारिक चर्चा करणे आणि त्यांच्या सुख दुःखात सहजरित्या सहभागी होणे असे कार्य अपेक्षित असते.