पिंपरी चिंचवड - नवनियुक्त पदाधिकारी पदग्रहण सोहळा
⚜️ पिंपरी चिंचवड शहर ⚜️
नवनियुक्त पदाधिकारी पदग्रहण सोहळा
🏵️🎖️🏵️
प्रबोधन संस्थेचे पिंपरी-चिंचवड, पुणे येथील राष्ट्रीय, प्रादेशिक मान्यवरांच्या तसेच प्रबोधन संस्थेचे सन्मानीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी अतिशय उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या वेळी प्रबोधन संस्थेचे पिंपरी चिंचवड
🔸 शहर अध्यक्ष - आदरणीय श्री. सुभाषभाऊ अमृतकर
🔸 महिला आघाडी अध्यक्षा - सौ. सविताताई नावरकर
🔸 युवा आघाडी अध्यक्ष - चि. सौरभ शिरोडे
यांनी आपली भूमिका मांडत शहर कार्यकारिणी व विभाग प्रमुख जाहीर केले
सोबत काही क्षण चित्रे 📸
🤝 #प्रबोधन_पर्व_आपण_सर्व 🤝
सविस्तर वृत्त -
दिनांक २०जुलै २०२५ रोजी धुळे येथे सर्व समाज स्नेहींच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड शहराची जबाबदारी
👉🏻 अध्यक्ष - श्री. सुभाष गणपत अमृतकर.
👉🏻 युवा अध्यक्ष - चि. सौरभ दत्तात्रय शिरुडे.
👉🏻 महिला अध्यक्ष - सौ. सविता शरद नावरकर.
यांच्या वर सोपवण्यात आली आहे.
त्यादृष्टीने आगामी कार्याची दिशा ठरवण्यासाठी व पुढील कार्यक्रमाचे आयोजन - नियोजन करण्यासाठी योगदान, वेळ देऊ शकतील अशा मान्यवरांशी आम्ही तिघांनी गेल्या दोन दिवसापासुन संपर्क साधुन चर्चा केली.
त्या नुसार नवीन सर्व समाज बांधवाना नवीन जबाबदारी देण्याचे ठरले. त्यासाठी प्रत्यक्षपणे एकत्रीत येवुन नियुक्ती पत्रे देण्याकरिता दिनांक २-८-२५ रोजी महिला व युवा टीम ने सभेचे नियोजन करुन त्याचे निमंत्रण संदेश व्हाट्सद्वारे आणि फोन च्या माध्यमातून पाठविण्यात आले.
त्यानुसर दि. ०२/०८/२०२५ रोजी नियोजित सभागृहात 100 समाज बांधवांच्या उपस्थितित सर्व नवनिर्वाचित सदस्यना नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले.
#प्रबोधन_पर्व_आपण_सर्व.. या घोषणे ने संपूर्ण हॉल मध्ये ऊर्जा व नवचैतन्य निर्माण झाले.
राष्ट्रीय उपाध्यक्ष बापूसाहेब शिरुडे.
राष्ट्रीय कार्यवाह दीपकजी येवले.
प्रदेश कार्यवाह भूषणजी सोंजे.
प्रदेश युवाध्यक्ष प्रशांतजी ब्राह्मणकर
यांचे मार्गदर्शन पर भाषण झाली.
या कार्यक्रमाला आदरणीय मनोजजी शिरोडकर, अरुण जी शिनकर, संजयजी कोतकर. रविंद्रजी मालपूरे, विजयजी शिंनकर. प्रकाश जी येवला.अश्या अनेक समाजबांधवांची उपस्थिती होती.
आपणास समाजातील समस्या विषयी, समाजाचा सर्वांगिण विकासाच्या दृष्टिने, हितावह असे कामकाज करुन समांजाचे नांव ऊंचावर नेवुण ठेवावयाचे आहे. त्याकरीता आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच हे होवु शकते.
ज्या समाज बांधवांचे नियुक्ती पत्रे अनुपस्थित असल्याने देता आली नाहीत अशांची वेळ घेवुन आम्ही समक्ष आपल्या घरी येवुन देण्याचा मानस आहे.
आपल्या सर्वांच्या सहकार्याची पुन्हा एकदा अपेक्षा करीत आहोत कारण हे टिम वर्क आहे.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने ने झाली.. सर्वानी चहा नास्त्या चा आस्वाद घेऊन हसत खेळत निरोप घेतला.
सर्व महिला टीम व युवा टीम ने आयोजन व नियोजन केले त्याबद्दल त्याचे मनापसून आभार 🙏.
जय हिंद, जय प्रबोधन, जय वाणी समाज..!!🙏🤝