भाषा:

राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक - पत्रकार परिषद,धुळे

19-07-2025 103 दृश्ये
राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक - पत्रकार परिषद,धुळे
धुळे येथे २० जुलै २०२५ रोजी होणाऱ्या वाणी समाजाच्या प्रबोधन संस्थेचा राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद धुळे येथील पत्रकार भवनात पार पडली. संस्थापक अध्यक्ष सुनिल तात्या नेरकर यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीची पार्श्वभूमी पत्रकारांना विशद केली आणि पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिले. समवेत तत्कालीन कार्यकारिणी मधून प्रदेशाध्यक्ष श्री. सुरेश बापू शिरुडे - पिंपरी चिंचवड, प्रदेश समन्वयक श्री. विवेक वाणी - नाशिक, प्रदेश कार्यवाह - श्री. अजय कासोदेकर - धुळे, सोशल मिडिया प्रदेशाध्यक्ष श्री. भूषणजी सोंजे, विवाह संमेलन आघाडीचे श्री. रविंद्र मालपुरे, प्रदेश युवा संघटक प्रशांत ब्राह्मणकर सर्व पिंपरी चिंचवड, धुळे शहराध्यक्ष श्री. पवन खानकरी, श्री. दिलीप पाखले तसेच धुळे जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.    लिंक - https://www.facebook.com/share/v/17HQbeNLJ6/