ध्येय - समस्त समाजबांधवांचे विविध क्षेत्रातील कर्तृत्व व सामाजिक सेवेच्या माध्यमातून त्या त्या कार्यक्षेञाचे संघटन करणे व त्या माध्यमातून समाज एकसंघ, विवंचानामुक्त, ज्ञानवर्धक समृध्द व प्रगतशील करणे हे ध्येय.

उद्दिष्टे -
मनभेदाच्या अंधःकाराला पळवून लावा... समाजमनाच्या जाज्वल्याचा प्रबोधनरूपी ठेवा !
ह्या उक्तीप्रमाणे चाललेली आपल्या प्रबोधन संस्थेची वाटचाल. राष्ट्र बांधणी हा प्रमुख उद्देश. समस्त समाजबांधवांचे एकसंघ संघटन करणे हे प्रमुख ध्येय. प्रबोधन संस्था लोकशाहीची मूल्ये जपणारी संस्था. त्यातल्या त्यात समन्वयाची शृंखला जोपासत महाराष्ट्र नव्हे तर देशव्यापी चळवळ उभारणारी संस्था. समाजप्रगती व समाजविकासाचा चंग बांधलेली आपली प्रबोधन संस्था.