लाडशाखीय वाणी / वाणी समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी विविध लोकप्रतिनिधी, विविध संघटना यांचेकडून केली जाणारी मागणी विचारात घेवून शासनाने सदर समाजाच्या सर्वांगिण विकास व आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत, उपकंपनी म्हणून “सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळाची” दि.04.03.2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये स्थापना करण्यात आली आहे. लाडशाखीय वाणी / वाणी समाजातील युवकांना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा (बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना) लाभ देण्यात येईल.
Website - Click
GR - Link

योजना - Click to apply
- वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना -
- गट कर्ज व्याज परतावा योजना रु.10.00 लक्ष ते रु.50.00 लक्ष
- शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना
- कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
- महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना
- २०% बीज भांडवल योजना
- रु.१.०० लक्षपर्यंतची थेट कर्ज योजना

उद्दिष्टे आणि कार्ये
- राज्यातील लाडशाखीय वाणी / वाणी समाजाच्या कल्याण व विकासासाठी काम करणे.
- लाडशाखीय वाणी / वाणी समाजाच्या व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगाराकरिता कर्ज उपलब्ध करून देणे व त्याची वसुली करणे.
- लाडशाखीय वाणी / वाणी समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पतसाधने, साधनसामुग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरविणे.
- लाडशाखीय वाणी / वाणी समाजासाठी कृषी उत्पादने, वस्तु, साहित्य आणि सामुग्री यांची निर्मिती, जुळवणी व पुरवठा यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे.
- राज्यातील लाडशाखीय वाणी / वाणी समाजाच्या कल्याणासाठी योजना सुरु करणे, त्यांना चालना देणे व योजनांसाठी अहवाल तयार करणे.
- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या धर्तीवर शासनाने मंजुरी दिलेल्या सर्व योजना राबविणे.