सस्नेह निमंत्रण
प्रबोधन संस्था - वैद्यकीय आघाडी
महाराष्ट्र राज्य
आयोजित
दसरा मेळावा - २०१८
आदरणीय लाडशाखीय डॉक्टर बंधु व भगिणी,
सस्नेह नमस्कार,
वैद्यकीय क्षेत्रात आपण अभूतपूर्व योगदान देत आहात परंतु मी ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजाचा मी देणं लागतो या दृढ संकल्पनेतुन समाजातील डॉक्टर बंधु भगिणीनींचे राज्यस्तरीय संघटन व्हावे, एकमेकांशी ओळख व्हावी, अनुभवांचे आदान प्रदान व्हावे या उदात्त हेतुने प्रबोधन संस्था या समाजातील एकमेव शासन दरबारी नोंद असलेल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय डॉक्टर आघाडीची स्थापना झाली आहे.
व्हाट्सअॅपच्या माध्यमातून संघटन झाले असतांना पुढचे पाऊल म्हणून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर समाजातील सर्व डॉक्टर बंधू भगिनींचे राज्यस्तरीय संमेलन घेण्याचे योजिले आहे, या संमेलनात विविध क्षेत्रातील नामांकित डॉक्टर्स अनेक विषयांवर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
सर्व डॉक्टर बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की, आपला बहुमूल्य वेळ काढून या पहिल्या एकदिवसीय राज्यस्तरीय लाडशाखीय वैद्यकीय मेळाव्याला उपस्थित रहावे.
दिनांक - १४ ऑक्टोबर २०१८, रविवार
वेळ - सकाळी ९.३० ते दुपारी ३ पर्यंत
ठिकाण - HCG ऑडीटोरियम, मुंबई नाका, नाशिक मुंबई महामार्ग, नाशिक.
मॅप लिंक - - https://goo.gl/maps/B38LcKMG6TN2
- निमंत्रक -
डॉ. प्रकाश भोकरे डॉ. निलेश कुंभारे
प्रदेश कार्यवाह प्रदेश अध्यक्ष
डॉ.सुधाकर मालपुरे डॉ. सदानंद वाणी
समन्वयक, नाशिक शहर प्रदेश उपाध्यक्ष
- समस्त कार्यकारिणी -
अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था, वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश